ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी वकिलांची निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी वकिलांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात निदर्शने केली. दिल्ली आंदोलनात पोलिसांनी वकिलांनाही ताब्यात घेतले होते. याचादेखील मुंबईतील वकिलांनी निषेध नोंदवला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वकिलांसोबत आम्ही आहोत. ‘वकील एकता झिंदाबाद’ अशा घोषणा यावेळी या वकिलांनी दिल्या. हुतात्मा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रॅली काढण्याचे या वकिलांचे नियोजन होते. पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली. त्यामुळे वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत निदर्शने केली.