बांगलादेशप्रमाणे देशात सत्तापालट घडविण्याचा कट; राजनाथ सिंह यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या जे आंदोलन सुरू आहे त्या आडून बांगलादेशप्रमाणे देशात सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा काँग्रेसला बदला घ्यायचा आहे. त्यासाठी देशात हिंसाचार आणि गोंधळ घालून सत्तापालटाच्या गोष्टी काँग्रेस करत आहे, असे राजनाथ म्हणाले.