
मुंबईच्या पूनम राऊतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत हिंदुस्थानी महिला क्रिकेटमधील एका महत्त्वाच्या पर्वाची सांगता केली. 15 ऑक्टोबरला तिने आपल्या निर्णयाची घोषणा केली. 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱया पूनमने हिंदुस्थानसाठी तिन्ही प्रकारांत फलंदाजी केली. तिच्या नावावर 3,282 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. यात 73 एकदिवसीय सामन्यांतील 2,299 धावा, 35 टी-20 सामन्यांतील 719 धावा आणि चार कसोटी सामन्यांतील 264 धावांचा समावेश आहे. 2017 च्या महिला विश्वचषकातील हिंदुस्थानच्या अंतिम फेरीतील प्रवासात तिची भूमिका महत्त्वाची होती.


























































