रोहितने वर्ल्ड कपपूर्वीच पत्ता कापल्याचे सांगितले होते, युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत अखेर मौन सोडत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2023 च्या विश्वचषक संघात तत्कालीन कर्णधार रोहित शर्माने चहलला स्थान दिले नव्हते. मात्र संघातून वगळण्यापूर्वीच रोहितने आपल्या रणनीतीची पूर्ण कल्पना दिली होती, असा खुलासा खुद्द चहलनेच केला आहे.

चहल म्हणाला,  ‘2023 मध्ये जेव्हा मी काऊंटी क्रिकेट खेळायला गेलो होतो तेव्हा रोहितने मला स्पष्ट सांगितले होते की, संघाला आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी हवी आहे आणि आम्ही याच रणनीतीनुसार पुढे जात आहोत. संघ विश्वचषकात एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह उतरण्याच्या तयारीत असल्याचे त्याने मला स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे मला या सगळ्याची आधीच कल्पना देण्यात आली होती.’