
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर ओढवलेल्या गंभीर आर्थिक संकटाची दखल घेत शिवसेनेने यंदाचा ‘जय भवानी दांडिया उत्सव’ रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उत्सवावर होणाऱ्या खर्चातून चंद्रपूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात पावसाअभावी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत कोणताही उत्सव साजरा न करता, संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मदतीचा आधार देणे गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकीचे भान जपत शिवसेनेने उत्सव रद्द करून थेट मदतीचा हात पुढे केला आहे. या निर्णयामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे संदीप गिर्हे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ५ हजार देत आहेत!
बाळासाहेबांची शिवसेना सरकारच्या दहा पाऊले पुढे आहे!
चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांचे अभिनंदन!
@Dev_Fadnavis https://t.co/pSwcf9mpoB— Sanjay Raut (@rautsanjay61) October 17, 2026
या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्यासह उपमहापौर दानव, स्थायी समिती अध्यक्ष मनस्वी गिर्हे, गटनेते राहुल विरूटकर, नगरसेवक आकाश साखरकर, नगरसेविका श्रुती घटे, नगरसेविका श्वेता लांडगे, सतीश भिवगडे आणि राहुल बेले आदी पदाधिकारी उपस्थित होते.





























































