
प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराला दिवसेंदिवस जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे मंदिराच्या शेजारीलच राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण संस्थेतील 13 निवासी सदनिका आणि सात व्यावसायिक जागा खरेदी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
प्रत्येक सदनिकेला प्रति चौरस फुटाला तब्बल 66 हजार रुपये दर आणि चाळीस टक्के अधिक चटई क्षेत्र मिळणार आहे. या खरेदी व्यवहारासाठी 94 कोटी 11 लाख रुपयांच्या खर्चास राज्याच्या विधी व न्याय विभागाने मान्यता दिली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण संस्थेची मालमत्ता खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांच्या रांगांचे व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे.





























































