‘गोकुळ’साठी चुरस, 99.96 टक्के मतदान, 50 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद, आज मतमोजणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) महायुतीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडीचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू समविचारी आघाडीत टोकाची लढत झाली. आज ‘गोकुळ’साठी अत्यंत चुरशीने 99.96 टक्के मतदान झाले. एपूण 5 हजार 418 पैकी 5 हजार 416 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एपुण 25 जागांसाठी रिंगणात उतरलेल्या 50 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, उद्या (दि. 19) मतमोजणी होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेदाचा वापर होऊन शपथी, भानामती, देवाचा कोप अशा सर्व हद्द पार केल्याचे दिसून आले. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या निवडणुकीसाठी कागल, करवीर, पन्हाळा, गगनबावडा, चंदगड, भुदरगड, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी, राधानगरी या दहा तालुक्यांमध्ये शंभर टक्के मतदान झाले.

महायुतीचे माजी आमदार राजेश पाटील, सुजित मिणचेकर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, ‘गोकुळ’चे माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ; तर समविचारी आघाडीकडून गोपुळचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील, माजी आमदार राजू आवळे, अंजनी रेडेकर, अभिजीत तायशेटे, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले यांच्यात लढत होती.