टपाल कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 60 दिवसांचा बोनस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने टपाल खात्यातील पात्र कर्मचाऱयांना 60 दिवसांच्या वेतनाएवढा उत्पादकता आधारित बोनस जाहीर केला आहे. दरमहा सात हजार रुपयांच्या वेतन मर्यादेच्या आधारे या पात्र कर्मचाऱयांना 13 हजार 816 रुपयांपर्यंत बोनस मिळू शकणार आहे. यामध्ये ग्रामीण डाक सेवकांचाही समावेश करण्यात आला आहे.

टपाल विभागाच्या आदेशानुसार मल्टी टास्पिंग स्टाफ, गट ‘क’ कर्मचारी, अराजपत्रित गट ‘ब’ कर्मचारी आणि पात्र ग्रामीण डाक सेवक यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे. बोनसची अंतिम रक्कम कर्मचाऱयाचे वेतन, सेवाकाल आणि लागू नियमांनुसार ठरवली जाणार आहे. नियमित विभागीय कर्मचाऱयांसाठी मूळ वेतन, महागाई भत्ता आणि इतर नियत भत्त्यांचा विचार करून बोनस दिला जाणार आहे. तसेच या कालावधीत सेवानिवृत्त झालेले, राजीनामा दिलेले किंवा अन्य कारणाने सेवा सोडलेले कर्मचारी तसेच प्रतिनियुक्तीवर गेलेले कर्मचारी यांच्यासाठीही नियमांनुसार पात्रतेचा विचार केला जाऊ शकतो.

ग्रामीण डाक सेवकांचाही समावेश

ग्रामीण डाक सेवकांसाठी बोनसची गणना त्यांच्या टाईम रिलेटेड पंटिन्युइटी अलाऊन्स आणि महागाई भत्त्याच्या आधारे केली जाणार असून त्यांनाही कमाल 13 हजार 816 रुपयांपर्यंत बोनस मिळू शकेल.