
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना एका अज्ञात इसमाने गोळ्या घालून ठार मारण्याची फोनवरून धमकी दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेत आहे.
जितेंद्र आव्हाड त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी असताना एका अज्ञात व्यक्तीने आव्हाड यांच्या मोबाईलकर फोन करून ‘तू खाली ये, तुला ठोकतो,’ अशी धमकी दिली. यासंदर्भात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.



























































