विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 182 उमेदवार रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vidhan bhavan mumbai

महाराष्ट्र विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी 182 उमेदवार रिंगणात असून साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी पाचही मतदारसंघांत 2 हजार 419 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघातून 41, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून 47 आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून 38 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसेच अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून 26 आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक 47 उमेदवार तसेच सर्वाधिक सर्वाधिक 3 लाख 88 हजार 19 मतदार आहेत.