शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी वाहनव्यवस्था आणि पोलिसांच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मेळाव्याच्या निमित्ताने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आले आहे.

पोलिसांच्या सूचना

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची वाहने सी. रामचंद्र चौक व वसंत देसाई चौक या ठिकाणी सोडून त्यानंतर सदरची वाहने शिवाजी पार्प येथील कामगार क्रीडा भवन (15 कार), वनिता समाज (15 कार), संयुक्त महाराष्ट्र दालन (15 कार), वीर सावरकर स्मारक (25 कार) येथे पार्ंकग करण्याकरिता घेऊन जावीत.

पश्चिम व उत्तर उपनगरातून येणाऱया मोठय़ा वाहनांतून (उदा. बसेस, टेम्पो इ.) एल.जे. रोड, राजा बढे चौक येथे कार्यकर्ते उतरल्यानंतर वाहने सेनापती बापट मार्गावर पार्ंकगकरिता पाठवावीत व जीप अथवा कारने जे.के. सावंत मार्गावरील कार्यकर्ते उतरल्यानंतर सदर वाहने कोहिनूर वाहनतळ येथे पार्ंकगकरिता पाठवावीत.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणारी मोठी वाहने (उदा. टेम्पो व बस इ.) सायन हॉस्पिटल मार्गे धारावी-माटुंगा-शोभा हॉटेल-राजा बढे चौक येथे कार्यकर्ते उतरून वाहने रुपारेल का@लेज येथे पार्ंकगसाठी पाठवावीत. तसेच लहान वाहनांतील कार्यकर्त्यांना राजा बढे चौक येथे उतरून ती वाहने कोहिनूर वाहनतळ येथे पार्ंकगकरिता पाठवावीत.

दक्षिण मुंबईतून येणारी वाहने (उदा. टेम्पो व बस इ.) ही डॉ. अॅनी बेझंट मार्गे स्वा. सावरकर मार्गावरून सूर्यवंशी क्षत्रिय सभागृह मार्गपर्यंत येतील व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर ती सयानी रोडने सेनापती बापट मार्गावर पार्ंकग करावीत.

जेवणाचे डबे, बॅगा आणू नका!

मेळाव्यासाठी येणाऱया शिवसेनाप्रेमी जनतेने व शिवसैनिकांनी जेवणाचे डबे, बॅगा अथवा अन्य वस्तू घेऊन येऊ नयेत असे निर्देश पोलीस अधिकाऱयांनी सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव दिले आहेत. या निर्देशांचे पालन तंतोतंत करावे. तसेच शिवाजी पार्प मैदानात प्रवेशद्वारातून प्रवेश करताना पोलीस सुरक्षा तपासणी अधिकाऱयांना सहकार्य करावे.

वाहने उभी करण्याची व्यवस्था

बसेस, टेम्पो ट्रव्हलर्स, मोठे टेम्पो

संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर (क्षमता 390 बसेस)

कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग दादर, मुंबई (क्षमता 390 बसेस)

आप्पासाहेब मराठे मार्ग (क्षमता 50 बसेस)

माहीम काॅजवे ते माहीम जंक्शन z फाईव्ह गार्डन, माटुंगा, मुंबई

एडनबाला रोड, माटुंगा, मुंबई  z नाथालाल पारेख, माटुंगा, मुंबई

आर. ए. के. रोड, वडाळा, मुंबई

चार चाकी हलकी वाहने

इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, दादर (क्षमता 500 कार)

इंडिया बुल्स 1 सेंटर, ज्युपिटर मिल कम्पाऊंड, एलफिन्स्टन, सेनापती बापट मार्ग, मुंबई (क्षमता 500 कार)

कोहिनूर पार्प, शिवाजी पार्प, मुंबई (क्षमता 1030 कार)

आसन व वाहन व्यवस्था 

शिवसेना पक्षप्रमुख व युवासेना प्रमुख तसेच शिवसेना नेते यांचे आमगन वीर सावरकर मार्गावरून होईल. त्यामुळे इतर शिवसेनाप्रेमी जनतेने व शिवसैनिकांनी या मार्गावर कोणतीही वाहने घेऊन येऊ नये.

शिवसेना उपनेते, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, निमंत्रित यांच्या आसन व्यवस्थेकरिता कालिकामाता मंदिराच्या शेजारून तसेच स्काऊट पॅव्हेलियनच्या बाजूने प्रवेश देण्यात येईल. या परिसरात आसन संख्या मर्यादित असल्याने निमंत्रण पत्रिकेशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.

शिवसेना नेते व व्यासपीठावरील मान्यवरांसाठी वीर सावरकर मार्गावरील उद्यान गणेश मंदिरा पुढील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारून प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पॅमेरामन व वृत्तपत्र प्रतिनिधींना समर्थ व्यायाम मंदिराकडून प्रवेश देण्यात येईल. त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश करावा व पोलिसांना सहकार्य करावे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ‘ओबी व्हॅन’ समर्थ व्यायाम मंदिर परिसरातच उभ्या कराव्यात.

शिवतीर्थावर येणाऱया शिवसैनिक व इतर मान्यवरांना शिवाजी पार्प येथे जाण्यास सोयीचे व्हावे यासाठी स्थानिक पोलीस व वाहतूक यंत्रणा नियंत्रित करणाऱय पोलिसांना वाहतुकीचे आणि गर्दीचे योग्य नियंत्रण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.