
एम. जी. रोड-विद्याविहार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाला ‘पद्मश्री नाना पाटेकर सेतू’ असे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेना ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने महापौर रितू तावडे, पालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि ‘एन’ विभाग प्रभाग समिती अध्यक्षा अश्विनी मते यांना निवेदन दिले आहे.
‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकरी आणि गरजूंच्या मदतीसाठी दिवंगत नाना पाटेकर यांनी मोठे काम केले आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा गौरव, मराठी अस्मितेचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राला योग्य आदरांजली देण्यासाठी विद्याविहारच्या पुलाला नाना पाटेकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) पाटील, नगरसेवक सुनील मोरे, नगरसेविका स्वरूपा पाटील, अजित गुजर, अजित भायजे, इम्रान शेख, अशोक वंडेकर, प्रकाश वाणी, अजय मंडलिक आदी उपस्थित होते.




























































