
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने यंदाही आपल्या कर्मचाऱयांना 14.25 टक्के बोनस जाहीर करून त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. यंदा बँकेच्या कर्मचाऱ्यांना किमान 57 हजार आणि 5 लाख 36 हजार तर सरासरी 81 हजार इतका बोनस मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांत प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या नेतृत्वाखाली बँकेत झालेला बदल अत्यंत लक्षवेधी आहे. यंदाच्या बोनस घोषणेमुळे बँकेच्या सेवकांची दिवाळी अधिक गोड होणार आहे. आगामी काळातही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रगतीची घोडदौड कायम राहील, असा विश्वास प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला आहे.




























































