
हिमाचलमधील किन्नौर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 505 वर दोन लष्करी ट्रकसह तीन ट्रकची धडक झाली. या अपघातात चार लष्कराचे जवान जखमी झाले. अपघातात तिन्ही वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, मिलिंगजवळील लिटिधार येथे सोमवारी दुपारी 1.30 च्या सुमारास लष्कराचे दोन आणि एका नागरी ट्रकची जोरदार धडक झाली. धडकेनंतर तिन्ही वाहने उलटली. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमी जवानांना चांगो येथील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. अपघाताच्या कारणाबाबत तपास सुरू आहे.




























































