दिवेकर वॉलस्टेब अँड स्नायडर प्रिसिजन सिल्सच्या कामगारांचा पगारवाढीचा करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाडा येथील दिवेकर वॉल स्टेब अँड स्नायडर प्रिसिजन सिल्स प्रा. लि. कंपनीच्या कामगारांचा पगारवाढीचा करार नुकताच करण्यात आला. यानुसार कामगारांच्या वेतनात तीन वर्षांसाठी 9031 रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली. याव्यतिरिक्त टर्म इन्शुरन्स 15 लाख, मेडिक्लेम 6 लाख, सानुग्रह अनुदान 19500 रुपये व इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. हा करार भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम आणि सहचिटणीस दिनेश पाटील यांच्या अथक प्रयत्नाने साकार झाला.

यावेळी व्यवस्थापनातर्फे समूह अध्यक्ष चैतन्य दिवेकर, मुख्य एचआर अधिकारी चंदन पाटील, महाव्यवस्थापक संदीप बिडवे, भारतीय कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष स्वप्नील पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव गणेश बांडे, खजिनदार प्रवीण पाटील, सदस्य नरेश गवळी उपस्थित होते. दिवाळीच्या तोंडावर हा करार करण्यात आल्यामुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.