Mumbai News – कुर्ल्यात 12 मजली इमारतीला आग; तीन मुलांसह 9 जण गुदमरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कुर्ला येथे 12 मजली इमारतीला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी 6.53 वाजता घडली. आगीमुळे इमारतीचे धूर पसरल्याने 9 जण गुदमरले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ धाव घेत आग विझवण्यास सुरवात केली. अथक प्रयत्नांनी अग्नीशमन दलाच्या जवानांनी 7.21 वाजता आगीवर नियंत्रण मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 मजली निवासी इमारतीमधील विद्युत डक्टला आग लागली. ही आग विद्युत वायरिंग आणि डक्ट्समधून पसरली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी, तीन मुलांसह नऊ जण जखमी झाले.

एशान अहमद (30), मोहम्मद शेख (5), फरीना बोनो (27), एजास अहमद (65), फरीन शेख (18), नैदया शेख (14), कलिमा साहा (45), अलीना शेख (17) आणि जाहेद अली शेख (55) अशी जखमींची नावे आहेत. जखमींची प्रकृती आता स्थिर आहे.