Chandrapur News चिमूरमध्ये शिळ्या अन्नामुळे १३ जणांना विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वजनिक कार्यक्रमातील उरलेले शिळे अन्न खाल्ल्याने १३ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील कोटगाव येथे समोर आली आहे. बाधितांना उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास सुरू झाल्याने गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमानंतर उरलेले अन्न खाल्ल्यानंतर काही जणांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलट्या, जुलाब आणि तापाची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी जांभूळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णांची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेत एकूण १३ जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. त्यापैकी १० जणांची प्रकृती सुधारली असून, तिघांना अद्याप तापाचा त्रास जाणवत आहे. या तिघांवर चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील उरलेले अन्न खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याने अन्नाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे कोटगाव परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.