Ratnagiri News – चिपळूणमध्ये 23 वर्षीय तरुणीने जीवन संपवलं, पोलिसांकडून अकस्मात मत्यूची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण तालुक्यातील रावळगाव सुर्वेवाडी येथे एका 23 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. अमिषा अरविंद सुर्वे (23) असे मृत तरुणीचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 20 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी चार वाजण्याच्या पूर्वी अमिषा सुर्वे हिने घराच्या पडवीमध्ये अज्ञात कारणावरून गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

कामथे उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चिपळूण पोलिसांनी 20 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद केली. तरुणीने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.