
सामना ऑनलाईन । चंद्रपूर
चंद्रपूर येथे अवैध दारू भरून घेऊन जाणाऱ्या वाहनाने पोलिसाला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत जबर जखमी झालेल्या पोलिसाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. छत्रपती चिडे असं या पोलिसाचं नाव असून, ते नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास मौशी चोरगावजवळ पेट्रोलिंग करीत असताना भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना उडवले. या वाहनात अवैध दारू असल्याची माहिती असल्याने पोलीस या मार्गावर तैनात होते. जखमी पोलीस चिडे यांचा ब्रम्हपुरी येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रत्यक्ष पोलिसालाच उडवण्याच्या या घटनेने अवैध दारुविक्रेत्यांची दादागिरी कशी वाढत चालली, हेही दिसून आलं आहे.
summary- a police got murdered by illegal liquor truck





























































