
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. त्याबरोबरच त्यांच्या आठवणींना देखील उजाळा देण्यात येत आहे. याच निमित्ताने शिवसेनाप्रमुखांचे नातू, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या सोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शालेय वयातील आदित्य ठाकरे क्रिकेटची बॅट घेऊन बॅटिंग करत आहेत, तर त्यांचं कौतुक करत त्यांच्या पाठीमागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे असल्याचे दिसत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या चेहऱ्यावर स्मित झळकत आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 23, 2019



























































