
आळंदी येथील सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी ( दि. 8 ) भीषण स्फोट होऊन दुर्दैवी घटना घडली. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी आहेत. जखमी व्यक्तींना ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोट विद्युत रोहीत्रामुळे झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत रामचंद्र निंबाळकर , संतोष माने ( रा. सोळू), आणि नवनाथ पांचाळ अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेत बेबीताई ठाकूर, नंदा शेळके, रणवीर गावडे, चंद्रकांत निंबाळकर, मोनू गौतम, दिनेश मौर्य, दीपक ठाकूर, गणेश कोटंबे, श्रुती ठाकूर, विठ्ठल ठाकूर, निवृत्ती ठाकूर, मनीषा फुलशेटे, बसवराज बनसोडे, नागेश ठाकूर, उमेश ठाकूर, शिवांश ठाकूर, अमेंद्र पासवान, रणजीत पासवान, अब्दुल खान या सर्वाचा जखमीं मध्ये समावेश आहे.
गुरुवारी पाचच्या सुमारास कंपनीत स्फोट झाला. या स्फोटाने परिसरास जोरदार हादरा बसला. परिसरातील घरांचे देखील नुकसान झाले. तसेच या कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या दुचाकी गाड्या जाळून खाक झाल्या. काही जनावरे देखील बाधित झाली आहेत.
स्फोट झालेल्या कंपनी मालकावर गुन्हा दाखल
सोळू गावात एल्युमिनियम प्लेट तयार करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. १९ जखमीं झाले असून त्यांचेवर ससून सह इतर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कमानीचे मालक नरेंद्र सुराणा (रा. गुलटेकडी, पुणे), फनेंद्र मुनोत (रा. शिवाजीनगर, पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































