भराडी आई माका पाव गे! आज आंगणेवाडीची जत्रा; लाखो भाविकांची गर्दी उसळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून जिची सर्वदूर ख्याती पसरलेल्या सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा यात्रोत्सव शनिवार 2 मार्चपासून सुरु होत आहे. दोन दिवस चालणारी या यात्रेची तयारीही पूर्ण झाली असून येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये याची तयारी झाली असल्याचे आंगणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी सांगितले. यंदाही श्री भराडी देवीच्या समोर होणाऱया ताटेकवळणीच्या महाउत्सवाला भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळणार आहे.

जागृत देवस्थान

मालवणपासून जवळच मसुरे गावातील आंगणेवाडी ही एक छोटी वस्ती आहे. या गावात भराडी देवीचे जागृत देवस्थान आहे. भराडी देवी नवसाला पावणारी म्हणून तिची प्रसिद्धी आहे. भक्त तिच्यापुढे नवस बोलल्यानंतर तो पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाङ्गी ते पुन्हा इथे दर्शनासाठी येतात. जत्रेसाठी कोणताही निश्चित दिवस किंवा तारीख नाही. ते सर्वसंमतीने ठरवले जाते.

देवीचा प्रसाद

आंगणेवाडी या गावातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेने मंदिरातील अन्न शिजवण्यात सहभागी व्हावे अशी इथली प्रथा आहे. त्यानुसार प्रत्येक घरातील महिला देवीसाठीचा प्रसाद बनवते. विशेष म्हणजे हा प्रसाद बनवताना कोणीही एक शब्दही बोलत नाही. मुक्यानेच हा प्रसाद बनवला जातो. नंतर जत्रेच्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली की संध्याकाळी देवीला प्रसाद देऊन मगच तो प्रसाद भाविकांना दिला जातो. दर्शनाला येणाऱया प्रत्येक व्यक्तीला हा प्रसाद मिळतोच. आंगणेवाडीत आलेल्या भाविकाला प्रसाद मिळावा यासाठी प्रत्येक घरातून तयारी केलेली असते.

अनोखी रामभक्ती

डोळ्यांवर पट्टी बांधून बाईकस्वारांची अयोध्यावारी हैदराबाद येथील दोन जादूगार डोळ्यांवर पट्टी बांधून दुचाकीवरून अध्योयेला निघाले आहेत. अशा पद्धतीने ते दोघे तब्बल 1600 किलोमीटरचे अंतर कापणार आहेत. मारुती जोशी आणि रामकृष्णा अशी या दोघांची नावे असून ते जादूगार आहेत. दोघे नागपुरात पोहचले असता त्यांनी रामटेक येथे प्रभू श्री रामांचे दर्शन घेऊन पुढे पंटगीपर्यंत डोळ्यांवर पट्टी बांधून पुढचा प्रवास करण्याचा निर्धार केला आहे. या प्रवासासाठी त्यांना नऊ दिवस लागणार आहेत. दररोज ते 200 किलोमीटरचे अंतर पार करणार आहेत. डोळ्यांवर पट्टी बांधून बाईक चालवण्यात प्रावीण्य मिळावे, यासाठी मारोती जोशी आणि रामकृष्ण यांनी सहा ते आठ महिने सतत सराव केला.

गुरुवारी केळी आणि खिचडी का खाऊ नये?

गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे. असंख्य लोक मनोकामना पूर्ती व्हावी यासाठी गुरुवारी उपवास करतात. उपवास करण्यासाठी सर्वात मोठा नियम म्हणजे या दिवशी मिठाचे सेवन करू नये. काही लोक सायंकाळी भगवान विष्णूला गोड प्रसादाचा नेवेद्य दाखवून त्याचे सेवन करतात. भगवान विष्णूचे व्रत ठेवल्याने भाग्योदय होतो, अशी अनेकांची धारणा आहे. गुरुवारी उपवास करायचा असेल तर त्यासाठी आणखी एक नियम म्हणजे खिचडी आणि केळी खाणे वर्ज्य आहे. केळी खाल्ल्याने भगवान विष्णूची कृपा मिळू शकत नाही. तसेच देवी माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. केळीसोबत खिचडी खाणे अशुभ मानले जाते. खिचडी खाल्ल्याने आर्थिक तंगी येऊन गरिबी वाढू शकते. घरात सुख-शांती हवी असेल तर गुरुवारी खिचडी खाणे टाळावे.

रोज दोनदा समुद्रात गडप होणारे शिवमंदिर

गुजरातमधील एक असे प्राचीन शिव मंदिर आहे जे फक्त दोनदा दर्शनासाठी समुद्राबाहेर येते. त्यानंतर ते पुन्हा गायब होते. त्या शिव मंदिराचे नाव आहे श्री स्तम्भेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर 150 वर्ष जुने आहे. श्री स्तम्भेश्वर महादेव मंदिर अरब सागर आणि खंभातच्या खाडीमध्ये आहे. मंदिराचा अद्भूत चमत्कार पाहायचा असेल तर सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत थांबावे लागेल. हातून काही पाप घडले असेल तर या ठिकाणी येऊन तुम्ही प्रायश्चित करू शकतात व येथे येणाऱया शिवभक्तांना मोक्ष मिळतो, अशी आख्यायिका आहे.

गजानन महाराजांचा रविवारी प्रकटदिन

श्री संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकटदिन रविवार 3 मार्च रोजी आहे. ‘श्रीं’चा प्रकट दिन महाराष्ट्रासह देश-विदेशात भक्तांकडून मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शेग्aाावनिवासी संत श्री गजानन महाराजांना श्री दत्तगुरुंचे तिसरे रुप म्हणून ओळखले जाते. ‘गण गण गणात बोते’ हा त्यांचा मंत्र. गजानन महाराजांचा जन्मदिवस कुणालाच माहीत नाही. ज्यादिवशी महाराज शेगाव येथे दिसले, तो दिवस ‘प्रकटदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पालखी, अभिषेक, पारायणांचे आयोजन करण्यात येते.