
राघव चढ्ढा यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे अंतरिम नेते म्हणून नियुक्ती करण्याची आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची विनंती राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळून लावली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनखर यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘हा पैलू ‘द लीडर्स अँड चीफ व्हीप्स ऑफ रेकग्नाइज्ड पार्टीज अँड ग्रुप्स इन संसद (सुविधा) कायदा, 1998′ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या अधीन आहे. विनंती स्वीकारले जात नाही’.
या महिन्याच्या सुरुवातीला केजरीवाल यांनी धनखड यांना चड्ढा यांना राज्यसभेत आपचे अंतरिम नेते म्हणून नियुक्त करण्यासाठी विनंती अर्ज दिला होता. कारण त्यांचे सभागृह नेते संजय सिंह न्यायालयीन कोठडीत होते.
धनखड यांनी नियमांचा हवाला देऊन केजरीवाल यांची विनंती नाकारल्याने, सिंह हे राज्यसभेत आपचे नेते राहिले आहेत.
























































