अभिज्ञान अकादमीतर्फे कृत्रिम बुध्दिमत्तेवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

चिंचपोकळी येथील अभिज्ञान अकादमीमार्फत विजयपर्व या अभियानांतर्गत ‘कृत्रिम बुध्दिमत्ता, शिक्षणाचे बदलते स्वरुप आणि नवी दिशा’ या विषयावर आधारित विशेष कार्यक्रमाचे नुकतचं आयोजन करण्यात आले. माटुंगा पश्चिम येथील अमुलक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रासाठी ग्राममंगलचे संस्थापक डॉ रमेश पानसे आणि एमकेसीएलचे अध्यक्ष विवेक सावंत यांनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. त्यांची मुलाखत ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आणि दिग्दर्शक अवधूत परळकर यांनी घेतली.

अभिज्ञानचे संस्थापक प्रा विजय जामसंडेकर यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्ताने बदलत्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा हा विशेष परिसंवाद होता.

बदलती माध्यम आणि सध्याच्या कृत्रिम  शिक्षणाबाबत बोलताना व्यक्तिगत बुध्दिमत्तेता कसा र्‍हास होत चाललाय यावर तज्ज्ञा आपली मतं मांडली. सध्याची शिक्षण व्यवस्था मुलांना व्यावसायिक बनवण्याचं काम  अधिक करत आहेत, त्यामुळे मुलांचा स्वत:चा विकास होत नाही. त्याची अभिव्यक्ती वृध्दिंगत होत नाही. त्याचबरोबर शैक्षणिक मेंदुशास्त्र सध्या  कसं विकसित होत चाललयं  हे ही त्यांनी सांगितलं.

यावेळी बुध्दिमत्ता म्हणजे काय, यावर प्रा. रमेश पानसेंनी आपले विचार मांडले. ‘सतत बदलत जातो तो मेंदू, एखादं मुलं नापास झालं तर तो ढ आहे असं नाही. एखादं अपयश वेगळी ओळख करुन देऊ शकते. आपण शिकतो म्हणजे आपला मेंदू शिकतो.” बुध्दिमत्ता कशी वाढते?  माणसाचा मेंदू हा ग्रहणशील असतो तो बदलण्यासाठी अऩुभवांचा गाठोडं उपयोगी येतं, त्यामुळे सतत मुलांना शिकवणं सोडा, त्यांना शिकू दया, त्यांच्या अनुभवातून त्यांची अभिव्यक्ती वृध्दिंगत होईल. असे त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाला उपस्थितांनी दाद दिली, तसेच या विषयावर यापुढेही असे परिसंवाद व्हायला हवेत असा सूर उपस्थितांमध्ये दिसून आला. यावेळी सध्याच्या अभिज्ञान अकादमीच्या संघटक माया व्हटकर यांनी अभिज्ञानच्या कार्याची माहिती दिली.