एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, मुंबईचे 4 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इर्टिका मोटार कारने एका वाहनाला धडक दिल्याने कारमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. पुणे – मुंबई एक्सप्रेस-वेवर खंडाळा घाटात फूडमॉलजवळ गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

वसीम साजिद काजी (रा. राजापूर, जि. रत्नागिरी), अमीरउल्ला महंमद हुसेन चौधरी, अब्दुल रहेमान खान कलीम अहमद खान (दोघेही रा. कुर्ला, मुंबई), अनिल सुनील सानप (रा. पुणे), आशुतोष नवनाथ गांडेकर (रा. अंधेरी पश्चिम, मुंबई), राहुल सुरेशचंद्र पांडे (रा. कामोठे, नवी मुंबई) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. इर्टिका मोटार कार (क्र. एमएच – 14 / ईसी – 3501) आठ प्रवासी घेऊन मोटारचालक मच्छिंद्र अंभोरे हे पुण्याहून मुंबईकडे निघाले होते.