पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणारे हे नाटक रितिका श्रोत्री सादर करणार आहे.

याबद्दल पार्थ भालेराव म्हणतो, मला ही कथा फार भावली. 1970 च्या काळातील ही कथा आहे. जोडप्याचे नवीनच लग्न झाले आहे, त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे तरी बायको नवऱयाची फसवणूक करत आहे. याचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे नाटकात पाहायला मिळणार आहे. नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे हे नाटक असून प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे.

यामध्ये रितिका श्रोत्रीr काम करत आहे. रितिका म्हणते,  यापूर्वीही मी एकपात्री प्रयोग केला आहे. एका जागी प्रेक्षकांना एक तास खिळवून ठेवणे, हे मोठे काwशल्य आहे आणि ही ताकद कथेमध्ये असते. प्रत्येक क्षणी ही कथा अनपेक्षित वळण घेते.  आता पुढे काय होणार याची.  या नाटकात मी पाच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

‘हम दोनो और सूट’चा पहिला प्रयोग 13 जानेवारी रोजी पुण्यातील दी बॉक्स येथे  होईल.