अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार झाली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली आहे. या पुरस्कारांचे हे 51 वे वर्ष असून येत्या 3 मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

‘रजनीकांत हे गेल्या पाच दशकांपासून चित्रपट रसिकांचे मनोरंजन करत आहेत. चित्रपटसृष्टीवर त्याचे अधिराज्य आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी ज्युरींनी निवड केली आहे. त्यांना हा पुरस्कार घोषीत करताना मला फार आनंद होत आहे’, असे जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा पुरस्कार मानला जातो. गेल्या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता.