
मराठीमधली गोड चेहऱ्याची अभिनेत्री अशी ओळक असणारी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने तिच्या चाहत्यांसोबत एक गूड न्यूज शेअर केली आहे. मृणाल ही गरोदर असून तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना ही खुषखबर दिली आहे.
View this post on Instagram
मृणालने इंस्टाग्रावर शेअर केलेल्या फोटोत लहान बाळाचे कपडे, शूज व टेडी बियर असून त्या कपड्यांवर कमिंग सून असे लिहलेले आहे. हा फोटोसोबत एक सुंदर कॅप्शनही तिने शेअर केली आहे.

मृणाल दुसानिसचे नीरज मोरे याच्यासोबत 25 फेब्रुवारी 2016 ला लग्न केले होते. मृणाल व नीरजचे अरेंज मॅरेज आहे. कांदेपोह्याच्या कार्यक्रमात त्या दोघांनी एकमेकाना पहिल्यांदा पाहिले होते. लग्नानंतर ती पती सोबत अमेरिकेत स्थायिक झाली. नीरज अमेरिकेत सॉफ्टवेयर इंजिनिअर आहे.
माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, अस्स सासर सुरेख बाई, हे मन बावरे या मालिकांमध्ये झळकली होती. अस्स सासर सुरेख बाई या मालिकेनंतर तिने काही काळाचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती हे मन बावरे या मालिकेत झळकली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून मृणाल कोणत्याही भूमिकेत दिसली नाही.



























































