वयाने लहान अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना त्यांना लाज वाटत नाही तर मी काय बोलणार? रत्ना शहा संतापल्या

उत्तम अभिनयासाठी नावाजल्या गेलेल्या रत्ना पाठक- शहा या आपल्या सडेतोड भूमिकांसाठीही प्रसिद्ध आहेत. वयाची पन्नाशी गाठल्यानंतरही मुख्य अभिनेता म्हणून काम करणाऱ्या आणि त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यांवर प्रेक्षक अनेकदा नाराजी व्यक्त करत असतात. रत्ना पाठक शहा यांनी बोचणाऱ्या शब्दात अशा अभिनेत्यांवर टीका केली आहे. आपल्या मुलीच्या वयापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्रींसोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना अभिनेत्यांना लाज वाटत नाही ही शरमेची बाब आहे असे त्या म्हणाल्या.

धक धक नावाचा एक चित्रपट 13 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला असून यात रत्ना पाठक शहा यांची भूमिका आहे. रत्ना पाठक-शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठ्या पडद्यावरील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या वयातील फरकाबाबत आपले मत व्यत्त केले. त्या म्हणाल्या की त्यांना लाज वाटत नसेल तर मी काय बोलू? आपल्या मुलीहून लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना त्यांना लाज वाटत नसेल तर ही शरमेची बाब आहे. शाहरूख खान, सलमान खान, अक्षयकुमार, आमीर खानसारखे बॉलीवूड कलाकार त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स करत असतात. ज्यावरून प्रेक्षक अनेकदा सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत असतात. रत्ना पाठक-शहा यांनी कोणाचे नाव घेतले नाही मात्र त्यांचा इशारा याच कलाकारांकडे होता असे म्हटले जाते.