साडेसात तासांच्या थरारक नाट्यानंतर अखेर बिबट्या जेरबंद

1096
leopard

सिडको एन वनच्या उच्चभ्रु वसाहतीमधील काळा गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका पडक्या घरात दबा धरून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आखेर वनविभाग पोलीस आणि मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना यश आले आहे, तब्बल साडेसात तास हे थरार नाट्य चालले, बघ्यांच्या गर्दीमुळे काही काळ बिबट्याला जेरबंद करण्यात अडथळे निर्माण झाले. नागरी वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे काही काळ या भागात भीतीचे वातावरण कायम होते.

सिडको एन 1 भागात सकाळी मॉर्निंग साठी गेलेल्या काही नागरिकांना बिबट्याचे अचानक दर्शन घडले. ही बाब एका उद्योजकाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली. सिडको भागातील सिडको एन वन भागातील गार्डन मध्ये बिबट्या शिरला आहे, त्याचा ताबडतोब बंदोबस्त करा अशी मागणी करण्यात आल्यानंतर वन विभागाच्या वन्यजीव विभागाचे अधिकारी आर आर काळे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यासोबतच पोलीस, महानगरपालिकेचे पथक तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले. तब्बल साडेसात तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या ला जेरबंद करण्यात या मंडळींना यश आले. बिबट्या एका पडक्या घरात घुसल्यानंतर तेथे जाळी टाकून बिबट्याला डॉट करण्यात आले ही गनमन मोईनोद्दीन शेख, प्रशांत आष्टेकर यांनी केली.

सिडकोत बिबट्याचा ‘मॉर्निंग वॉक’, नागरिकांचे ‘जॉगिंग’

 

आपली प्रतिक्रिया द्या