भारतीय कामगार सेनेचा दणका; एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट लिमिटेड व्यवस्थापन वठणीवर

52
air-india-new
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

कर्मचाऱ्यांचा पगार, बोनस आणि अन्य सोयीसुविधांबाबतच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कामगार सेनेने एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट लिमिटेड व्यवस्थापनाच्या कार्यालयावर धडक दिली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शेकडो कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री 10 वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. भारतीय कामगार सेनेने दिलेल्या या दणक्यामुळे अखेर विमानतळ व्यवस्थापन वठणीवर आले आणि कर्मचाऱयांच्या मागण्या मान्य करत लेखी आश्वासनही दिले.

कंपनी व्यवस्थापनाने सहाय्यक कामगार आयुक्त सनी यांच्यासमोरच सही शिक्क्यासह कामगारांच्या मागण्या मान्य करण्याबाबतचे लेखी आश्वासन दिले. दिलेल्या आश्वासनांची येत्या 15 डिसेंबरपर्यंत पूर्तता करू असेही सांगितले. या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर भारतीय कामगार सेना विमानतळ व्यवस्थापनाला धडा शिकवल्याशिवाय राहाणार नाही असा इशारा भारतीय कामगार सेनेने यावेळी दिला. भारतीय कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस संतोष चाळके, चिटणीस संजय कदम, संतोष कदम, सूर्यकांत पाटील, निलेश ठाणगे, विजय शिर्के, उल्हास बिले आणि अमोल कदम यांच्या यशस्वी मध्यस्थीने सहाय्यक कामगार आयुक्त सनी, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी शर्मा, जी. एम. डोंगरे, एच. आर. मॅनेजर सावंत, निर्भवणे, पायस यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी चर्चा करण्यात आली.

कामगारांच्या या मागण्या मान्य
कामगारांना वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत कायमस्वरूपी कामाची हमी.
कामगारांची छळवणूक तत्काळ थांबणार, व्यवस्थापनाकडून सहकार्य मिळणार.
कामगारांना कुठल्याही कारणावरून तडकाफडकी काढणार नाही. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणार. नियमानुसार पुढील कार्यवाही होणार.
कामगारांना रेल्वे स्थानकापर्यंत बससेवा देणार.
आकसापोटी कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करणार.
काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांवर कुठलीही कारवाई होणार नाही.
अनुभव आणि कामाच्या पद्धतीनुसार पगारवाढ मिळणार.
वैद्यकीय सुविधा, सुट्टय़ांबाबत युनियनसोबत बोलून निर्णय घेणार.
भारतीय कामगार सेनेला युनियन म्हणून व्यवस्थापनाची मान्यता.
भारतीय कामगार सेनेसोबत चर्चा करून 15 डिसेंबरपर्यंत पगारवाढ जाहीर करणार.

summary- air india accepts all the demand of employees

आपली प्रतिक्रिया द्या