‘मास्टर माईंड शोधून….’, आदित्य ठाकरे-प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यानंतर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे व काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. या घटनेमागील मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. त्याला कडक शासन झाले पाहिजे, अशी भूमिका यावेळी अजित पवार यांनी मांडली.

प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले की, ‘दोन दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील हल्ला झाला होता. त्यानंतर काल प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्र्यांनी तातडीने माहिती घ्यायला हवी. गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन ताबडतोब त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे. या घटनेमागील मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. त्याला कडक शासन झाले पाहिजे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करणे ही राज्य सरकारची आणि पोलीस खात्याची जबाबदारी असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

50 ते 60 टक्के खर्च जाहिरातींवर आणि विकासकामांवर 7 ते 8 टक्के खर्च होतो. मागच्या काही महिन्यातील ही आकडेवारी असल्याचे पत्रकारांनी सांगितले. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. हे जाहिरातबाजी केल्याशिवाय सर्वसामान्यांना कसे कळणार? असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. कुठे खर्च करावा, कशाला प्राधान्य द्यावे हे कळायला हवे. दुर्लक्षित-वंचित वर्गाचे राहणीमान उंचावण्यासाठी सरकारने लोकाभिमुख कारभार करायचा असतो, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.