उत्तर प्रदेशात निवडणुकीपूर्वी पुन्हा SIR होणार; अखिलेश यादव यांचा मोठा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी SIR बाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी लोकांना आणखी एका एसआयआर (SIR) बाबत इशारा दिला आहे.

अखिलेश यादव यांनी दावा केला आहे की, उत्तर प्रदेशात निवडणुकीपूर्वी एसआयआर (SIR) पुन्हा घेण्यात येईल. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव नक्की तपासा. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी एसआयआरद्वारे होणाऱ्या मतदार याद्यांच्या छाननीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी पुन्हा एसआयआर घेण्यात येऊ शकतो, त्यामुळे खऱ्या मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याचा धोका आहे. अखिलेश यादव यांनी लोकांना त्यांच्या मतदार याद्या तपासण्यात आणि त्या दुरुस्त करण्यात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अखिलेश यादव यांनी यापूर्वीही एसआयआर (SIR) बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. पडताळणी प्रक्रियेमुळे खऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी लोकांना आपली नावे आणि इतर माहिती त्वरित तपासण्याचे आवाहन केले.