सिंधुदुर्ग विमानतळावरून दुसरे विमान टेक ऑफ घेणार! बुधवारपासून अलायन्स एअरची दुसरी विमानसेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपी, परुळे (ता. वेंगुर्ले) येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून बुधवार 1 फेब्रुवारी 2023पासून अलायन्स एअरची नव्याने दुसरी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईसोबतच आता हैदराबाद व म्हैसूर ही महत्त्वाची शहरे सिंधुदुर्गला विमानसेवेने जोडली जाणार आहेत. सुरुवातीला आठवडय़ातून दोन दिवस ही विमानसेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचे जनसंपर्क अधिकारी विवेक देवस्थळी यांनी दिली.

आयआरबी इन्फ्राने सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी, परुळे येथे हे विमानतळ विकसित केले आहे. या जिह्याच्या विकसात भर टाकणाऱया सिंधुदुर्ग विमानतळावरून गतवर्षीपासून अलायन्स एअरची सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग अशी विमानसेवा सुरू आहे. सध्या अलायन्स एअरची सिंधुदुर्ग – मुंबई आणि मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा आठवडय़ातून पाच दिवस चालू आहे. आता या विमानतळावर नव्याने दुसरी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या विमानतळावरून बुधवार दि. 1 फेब्रुवारीपासून आता दुसरे विमान उड्डाण करणार आहे.

मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई ही विमानसेवा देणाऱया अलायन्स एअर या पंपनीतर्फेच या हैदराबाद- म्हैसूर – सिंधुदुर्ग – म्हैसूर – हैद्राबाद या दुसऱया विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येणार असून सुरुवातीच्या काळात दर बुधवारी आणि रविवारी अशी आठवडय़ातून दोन दिवस ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. या विमान सेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वेस हैदराबाद आणि दक्षिणेस म्हैसूर या देशातील अत्यंत महत्त्वाच्या शहरांशी विमानसेवेने जोडला जाणार आहे. विमान पंपनीमार्फत जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सदर विमान दर बुधवारी हैदराबादवरून निघून म्हैसूर मार्गे सायंकाळी 5.30 वा. सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल व सायंकाळी 6 वा. म्हैसूर मार्गे हैदराबादकरिता उड्डाण करेल तर दर रविवारी हैदराबादवरून निघून म्हैसूर मार्गे सायंकाळी 5.30 वा सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल व सायंकाळी 6.30 वा. म्हैसूर मार्गे हैदराबादकरिता उड्डाण करेल. कोकणातील जास्तीत जास्त प्रवाशांनी या विमानसेवा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग विमानतळ दृष्टिक्षेपात
दक्षिण कोकण प्रांतातला सिंधुदुर्ग विमानतळ हा देशांतर्गत विमानसेवेबरोबरच खासगी विमानसेवेची हाताळणी करण्याची क्षमता असलेला पहिलाच राष्ट्रीय विमानतळ असून त्याद्वारे कोकण प्रांत मुंबई, दक्षिणी राज्ये, पश्चिम महाराष्ट्र तसेच देशाच्या इतरही भागाशी थेट जोडला जाणार आहे. विमानतळामुळे केवळ प्रवाशी वाहतूकच नव्हे माल वाहतूक, स्थानिक जनतेकरिता व्यवसाय संधी, रोजगार निर्मिती होणार आहे. गर्दीच्या काळात आगमन आणि निर्गमन क्षेत्रात एकाच वेळी प्रत्येकी 200 प्रवाशी हाताळण्याची क्षमता तसेच प्रत्येक 400 प्रवाशी संख्या वाढीपर्यंत कार्यक्षम हाताळणी शक्य आहे. त्याचबरोबर प्रवाशी टर्मिनल इमारत प्रत्येकी 450 प्रवाशी हाताळणीच्या दृष्टीने कार्यक्षम आहे. स्वतंत्र इंधन पुरवठा व्यवस्था, अग्निशमन पेंद्र, नाईट लँडिंगसाठी सक्षम, स्वतंत्र विमान वाहतूक नियंत्रण कक्ष, प्रवाशी टर्मिनल इमारत, प्रशासकीय इमारत, वाहनतळ आणि सुरक्षा मनोरे इत्यादीची उपलब्धता करण्यात आली आहे. 2.5 कि.मी. लांबीची धावपट्टी असल्याची माहिती आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचे जनसंपर्क अधिकारी विवेक देवस्थळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.