प्रदर्शनाआधीच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ ने बनवला विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साऊथ सिनेमाच्या चाहत्यांना अल्लू अर्जुनच्या सिनेमांची प्रतिक्षा असते. अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाने त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये आणखी वाढ झाली आहे. आता चाहत्यांना त्यांच्या ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. ‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनच्या लूकची प्रचंड चर्चा होत आहे. तर या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच नवा रेकॉर्ड बनवला आहे. ‘पुष्पा 2’ ने बाहुबली आणि आरआरआर सिनेमांना मागे टाकत प्रदर्शनापूर्वीच नवे रेकॉर्ड बनवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा 2- द रूल’ ने आपले ऑडिओ राईट्स विकून नवा रेकॉर्ड बनवला आहे. सिनेमाने  शानदार कमाई केली आहे. ब्लॉकबास्टर सिनेमा आरआरआर आणि ‘बाहुबली 2’ मागे टाकत ‘पुष्पा 2’ ने महागडे म्युझिक राईट्स विकले आहेत. मीडीया वृत्तानुसार, या सिनेमाचे डायरेक्टर सुकुमारने सिनेमांचे ऑडिओ राइट्स मोठ्या किंमतीत विकले आहेत. द सियासेटच्या वृत्तानुसार, यासाठी 65 कोटी एवढी मोठीा रक्कम देण्यात आली आहे. याचबरोबर पुष्पा 2 साऊथचा म्युझिक राइट्स देऊन मोठी किंमत मोजणारा पहिला सिनेमा बनला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

याआधी साऊथचा सुपरहिट आणि सर्वात मोठ्या सिनेमांमध्ये बाहुबली 2 आणि आरआरआरच्या ऑडिओ राइट्ससाठी फिल्ममेकर एसएस राजमौलीला 10 ते 25 कोटींमध्ये मिळाले होते. अशामध्ये पुष्पा 2 ने या सिनेमांना मागे टाकत नवा विक्रम केला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही हिट ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

नुकतेच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसादिवशी ‘पुष्पा 2’ चा टीझर रिलीज केला आहे. टीझरच्या शेवटी अर्जुनला पाहील्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटले. याच दिवशी पुष्पा द रूलवरुन फर्स्ट लूक शेअर केले होते. चाहत्यांना त्याचा वेगळा अंदाज प्रचंड आवडला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.