योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, झुबेर यांना जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांच्याविरोधातील सहाही एफआयआर आणि कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्यानंतर आता न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला आहे. तसेच न्यायालयाने त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेशही उत्तप प्रदेश पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला मोठा झटका बसला आहे.

सोशल मीडियात प्रक्षोभक फोटो आणि मजकूर पोस्ट केल्याच्या आरोपावरून ‘ऑल्ट न्यूज’चे सह-संस्थापक, पत्रकार मोहम्मद झुबेर यांना 27 जून रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष युनिटने अटक केली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोहम्मद झुबेर यांना 2020मधील एका प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. ही चौकशी सुरू असतानाच संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी 2018 मध्ये केलेल्या ट्विटबद्दल झुबेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या ट्विटमधून झुबेर यांनी विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता व त्या प्रकरणी त्यांना अटकही केली होती.