
जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनला कोरोना विषाणूने ग्रासले आहे. मार्चपासून सप्टेंबरपर्यंत अमेरिकेतील 19,800 हून अधिक कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. महामारीसंबंधी सुरक्षेचे नियम पाळत नसल्याच्या तक्रारी कामगारांनी केल्या होत्या. त्यानंतर टीका झाल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने अखेर शुक्रवारी रुग्णांची संख्या जाहीर केली.
अमेरिकेतील होल फूड मार्केट ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करणाऱयांसह एकूण 10 लाख 30 हजार इतके ऍमेझॉनचे कामगार आहेत. या कामगारांमध्ये ज्या प्रमाणात संसर्गाची भिती होती, त्या तुलनेत संसर्ग नियंत्रणात राहिल्याचे कंपनीने म्हटले आहे. जर सर्कसामान्य अमेरिकन नागरिकांप्रमाणे ऍमेझॉन व होल फूड्स सेंटरमध्ये संसर्ग झाला असता तर कोरोनाग्रस्त कामगारांची संख्या 33 हजारांच्या पुढे गेली असती, असेही कंपनीने म्हटले आहे. कंपनी सुरक्षेबाबत हयगय तसेच कोरोना संसर्ग झालेल्या कामगारांची आकडेकारी जाहीर करीत नसल्याची तक्रार लॉजिस्टिक सेंटर्समधील कामगारांनी केली होती. त्यावर कंपनीने शुक्रवारी खुलासा केला.
650 केंद्रांवर दररोज 50 हजार चाचण्या
ऍमेझॉनच्या 650 केंद्रांवर दररोज 50 हजार कामगारांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनच कामगारांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतर्क केले. ज्या बिल्डिंगमध्ये नवीन रुग्ण सापडतो, तेथील कामगाराला त्या रुग्णाची माहिती दिली जाते, असा दावा कंपनीने केला आहे.

























































