अंबाजोगाईत प्रतिदिन आणखी 1200 चाचण्या वाढणार

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना बळ देण्याच्या दृष्टीने अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयास मागील महिन्यात मागणी केलेल्या अद्ययावत डिजिटल एक्सरे (रेडिओग्राफी) मशिन्स रूग्णालय प्रशासनास प्राप्त होणार आहेत.

या मशिन्सच्या खरेदीसाठी 42.60 लाख रूपये जिल्हा वार्षिक विकास योजनेतून उपलब्ध करून देण्यात आले होते. अंबाजोगाईत आता आणखी प्रतिदिन 1200 कोविड चाचण्यामध्ये वाढ होणार आहे.

स्वाराती रूग्णालयात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी 1 लाख रूपये किमतीची आणखी एक आरटीपीसीआर मशिन व दहा लाख रूपयांचे बायोसेफ्टी कॅबिनेट देखील खरेदी करण्यात आले असून, या मशिन्स काल रात्री प्राप्त झाल्या आहेत.

मागील आठवड्यात बीड येथे ना.मुंडेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वाराती ग्रामीण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी याबाबत मागणी केली होती, ही मागणी एका आठवड्याच्या आत मार्गी लागल्याने डॉ.सुक्रे यांनी समाधान व्यक्त केले आहे. एक आरटीपीसीआर मशीन वाढल्याने अंबाजोगाई येथे प्रतिदिन आणखी 1000 ते 1200 चाचण्या करता येतील.

आपली प्रतिक्रिया द्या