दोन शर्टांच्या चोरीसाठी त्याने 20 वर्षांचा कारावास भोगला..कारण वाचून हैराण व्हाल

किरकोळ चोरीसाठी एखाद्या गुन्हेगाराला काही महिन्यांची किंवा फारतर वर्षभराची शिक्षा होऊ शकते. मात्र एका चोराला अवघ्या दोन शर्टांची चोरी केली म्हणून त्याच्या आयुष्यातील वीस वर्ष मोजावी लागली. तब्बल वीस वर्षांनी तो तरुण तुरुंगातून बाहेर पडला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये ही घटना घडली असून द इनोसेन्स प्रोजेक्टच्या प्रयत्नानंतर न्यायालयाने वीस वर्षाने त्या व्यक्तीची सुटका केली आहे.

अमेरिकेतल्गाया वॉशिंग्टनमधील ही घटना असून गाय फ्रॅंक असे आरोपीचे नाव आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार 67 वर्षीय फॅंक हा सराईत चोर आहे. या चोराने 2000 साली सॅक्स फिफ्थ एव्हेन्यूमधून दोन शर्ट चोरले होते. याआधीही त्याने वेगवेगळे अपराध केल्याने त्याला 36वेळा अटक झाली होती. त्याच्यावर चोरी केल्याचे आणि कोकेन बाळगल्याचे गुन्हे दाखल होते. त्याला 1990 साली तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. वर्ष 2000 मध्येही त्याच्यावर चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला.

लुइसियानामध्ये चोरी करणे हा मोठा अपराध मानला जातो. त्यात दोषी आढळल्यास 23 वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. त्यामुळे न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली होती. मात्र लहान अपराधासाठी जास्त काळाची शिक्षा भोगत असलेल्या गुऩ्हेगारांसाठी मदत करणाऱ्या द इनोसेन्स प्रोजेक्ट न्यू ऑरलियन्स नावाच्या अभियानांतर्गत न्यायालयाने त्याची सुटका केली आहे. इनोसेंस प्रोजेक्ट न्यू ऑरलियन्सच्या माहितीनुसार फ्रॅंकच्या प्रकरणात कृष्णवर्णीय लोकांना लक्ष केले जात आहे. फ्रॅंक हा समाजाला नुकसान पोहोचवणारा नव्हता. हे माहित असूनही त्याला एवढी कठोर शिक्षा देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या