अमेरिकेच्या राजदूताची ‘हिंदी की पाठशाला’; हिंदी म्हणींचा व्हिडिओ होतोय व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदी दिवसाचे औचित्य साधून आज हिंदुस्थान आणि अमेरिकेतील मैत्री दर्शकण्यासाठी, मुंबईतील अमेरिकी वाणिज्य दूतावासाने एक मजेशीर व्हिडियो अपलोड केलाय. या व्हिडिओत अमेरिकेचे राजदूत ऍडम हॉल हे हिंदी म्हणींचे धडे देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ चांगलाच क्हायरल होत आहे. ऍडम हॉल यांना हिंदी भाषा खूप आकडते. ते गेल्या चार कर्षांपासून हिंदी शिकत आहेत. त्यांचा हिंदी म्हणींचा व्हिडिओ हिंदी दिवसाच्या दिवशी चांगलाच व्हायरल होत आहे. ‘मुह मे राम बगल में छुरी’, ‘खाली दिमाग शैतान का घर’, ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ अशा म्हणींचा अर्थ ते इंग्रजीत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र ‘चोर चोर मौसेरे भाई’ या म्हणीवर त्यांची गाडी अडते. त्यांना ‘मौसेरे’ या शब्दाचा अर्थ समजला नाही, असे व्हिडिओत दिसते. अमेरिकेच्या एका राजदूताने हिंदी म्हणी समजून घेणे, त्यांचा इंग्रजी अर्थ सांगणे किंवा त्या अर्थाच्या जवळ जाणारी इंग्रजी म्हण सांगणे, हा प्रयोग लोकांना फार आवडला आहे.