
सामना ऑनलाईन । बंगळुरू
कर्नाटकमधील धारवाड येथे एक निर्माणाधीन चार मजली इमारत कोसळली असून या इमारतीच्या मलब्याखाली तीसहून अधिक जण अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून मलब्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तीन अग्निशमन दलाच्या गाड्या, 4 जेसीबी, 10 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
#SpotVisuals: An under-construction building collapses in Kumareshwar Nagar, Dharwad, many feared trapped; Search and rescue operation underway#Karnataka pic.twitter.com/zOfdnPH2zD
— ANI (@ANI) March 19, 2019
कुमारेश्वरी भागातील बेलगावी रोडवर असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले होते. तळाच्या मजल्यावरील व पहिल्या मजल्यावरील गाळे भाड्याने दिले होते. तर आणखी तीन मजले बांधण्याचे काम सुरू होते त्यावेळीच ही दुर्घटना घडली. इमारतीतील तब्बल साठ गाळ्यांमध्ये वेगवेगळी दुकाने होते त्यात एक फार्मसीचे दुकान देखील होते.
























































