
नांदेड जिल्ह्यातील बिलोलीचे पोलीस निरीक्षक असणारे धाराशिवचे सुपुत्र आनंद मळाळे यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून सोलापुरात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. मळाळे यांच्या आत्महत्येची सीआयडी चौकशी करून दोषींवर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी लेखी मागणी मळाळे कुटुंबीयांसह विविध संघटनांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
आनंद मळाळे हे 25 वर्षांपासून पोलीस दलात सेवेत होते. मळाळे हे कुटुंबीयांसह सोलापूर येथे वास्तव्यास होते. शनिवारी (दि. 7) पहाटे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी त्याच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीमध्ये वरिष्ठांवर आरोप करण्यात आले होते, तर कुटुबीयांनी वरिष्ठांच्या त्रासाने आत्महत्या केल्याचा आरोप केला.
याप्रकरणी आनंद माळाळे यांची पत्नी किंका मुलगा यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. मळाळे कुटुंबीयांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी. या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करून पोलीस अधीक्षक हानपुडे-पाटील, पोलीस निरीक्षक नरूटे, कासेकर यांच्यासह इतर दोषी अधिकाऱयांकर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर कंदना मळाळे, रंजना मळाळे, यशवंत मळाळे, मयूर मळाळे, राजाभाऊ ओव्हाळ, विशाल शिंगाडे, रवी मळाळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.



























































