राज ठाकरे आता सभा घेऊन कोणाचं पोर कंबरेवर खेळवणार आहेत? अनिल परब यांचा बोचरा सवाल

मुंबईत दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर म्हणजेच शिवतीर्थावर येत्या 17 तारखेला शिवसेनेचीच ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सभा होईल, असं पक्षाचे नेते अनिल परब यांनी निक्षून सांगितलं. शिवतीर्थावर 17 तारखेला सभा घेण्यासाठी मनसेनेही अर्ज केला आहे. यावरून अनिल परब यांनी राज ठाकरे यांच्यासह मनसेला सणसणीत टोला लगावला आहे.

आमच्या माहिती प्रमाणे शिवसेनेने सर्वात आधी म्हणजे ज्या दिवशी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या त्यावेळी आम्ही ताबडतोब शिवाजी पार्कसाठी पत्र दिलं होतं. आता असं कळतंय की राज ठाकरेंच्या मनसेनेही पत्र दिलेलं आहे. पण त्यांनी तर सांगितलंय, मी दुसऱ्या कोणाचं पोर माझ्या कंबरेवर खेळवणार नाही. आता जर सभा घेणार असतील तर कोणाचं पोर ते खेळवणार आहेत? हे बघावं लागले, असं म्हणत अनिल परब यांनी मनसेवर हल्लाबोल केला.

त्यांच्या पक्षाचा तर एकही उमेदवार नाहीये. मग कोणाच्या पोरासाठी? कोणाच्या लग्नाच्या वरातीत ते नाचणार आहेत? या सगळ्या गोष्टी आता बघाव्या लागतील. त्यासाठी ते आटापिटा करणार आहेत का? असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.

मोदी त्या बलात्काऱ्याची पाठ थोपटत आहेत, हेच भाजपचे चारित्र्य; प्रज्ज्वल रेवन्नावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल

मागच्या वेळीही अशाच प्रकारचा गोंधळ किंवा घुसवा घुसवी ही दसरा सभेच्या वेळेला वॉर्ड ऑफिसरने केली होती. मी वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन ती पकडली, सर्व एन्ट्री बघितल्या. आणि त्यात ज्या काही गोष्टी लक्षात आल्या. ही जर परवानगी दिली नाही तर काय होऊ शकतं ते? हे त्यावेळी महापालिकेच्या आयुक्तांना लक्षात आलं. आमचा अर्ज कधी दिला, तेही आता आम्ही तपासलं आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

शरद पवार, उद्धव ठाकरेंसारखे नेते आहेत तोपर्यंत महाराष्ट्र दिल्लीपुढे कधी झुकणार नाही; संजय राऊत यांनी ठणकावलं

वायकर, जाधव यांच्यावरून परब यांचा सोमय्यांना टोला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत त्यांना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून अनिल परब यांनी खोचक टोला लगावला आहे. रविंद्र वायकर, यामिनी जाधव आणि राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला किरीट सोमय्या यांना स्टार प्रचारक करावं, असं म्हणत अनिल परब यांनी गद्दारांना सुनावलं. तसेच नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण गोडसे यांना नाशिकमध्ये कुठेही फायदा होणार नाही, असं भाकित अनिल परब यांनी वर्तवलं आहे.