मोदी त्या बलात्काऱ्याची पाठ थोपटत आहेत, हेच भाजपचे चारित्र्य; प्रज्ज्वल रेवन्नावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल

कर्नाटकमधील भाजप उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना यांचं सेक्स स्कँडल बाहेर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी भाजपसह धर्मनिरपेक्ष जनता दलाला (जेडीएस) धारेवर धरलं आहे. या प्रकरणी चौकशीसाठी कर्नाटक सरकारने एसआयटी नेमली आहे. तर प्रज्ज्वल रेवन्ना हे विदेशात पळून गेल्याची माहिती आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार करतानाचे प्रज्ज्वल रेवन्ना यांचे शेकडो व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यावरून शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी, शहांनीच प्रज्ज्वल रेवन्नाला विदेशात पळवलं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

कर्नाटकमधील सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवन्ना हा जर्मनीत पळाला. मोदी आणि शहांनी त्यांना विदेशात पळवलं. मोदींचा तो अतिशय लाडका उमेदवार होता. कर्नाटकमध्ये प्रचारासाठी गेले तेव्हा मोदी प्रज्ज्वल रेवन्नाची पाठ थोपटून कौतुक करत होते. 2000 बलात्कार केले म्हणून मोदी त्यांची पाठ थोपटत होते. 2000 बलात्कारांचा विक्रम करणाऱ्याची पाठ मोदी नाही थोपटणार तर कोण थोपटेल? त्यामुळे अशा माणसाला सुरक्षा पुरवली जाईल. खोट्या केसेस दाखल करून विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्याला पकडण्यात येतं. पण त्यांच्या परिवाराचा एक सदस्य प्रज्ज्वल रेवन्ना यांचे 2000 हून अधिक बलात्काराचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आणि मोदी त्या बलात्काऱ्याची पाठ थोपटत आहेत, हेच भाजपचे चारित्र्य आहे. त्यांना पळवण्यात आलं. मोदींना त्याचा इतिहास माहिती नव्हत का? आमचा इतिहास खोदून काढत आहेत, आमची बँक खाती, गुन्हे तपासत आहेत. मग 2000 बलात्कार करणारी व्यक्ती तुमच्यासोबत बसते, त्यांची माहिती तुम्हाला नाही? हेच तुमचे भाजपचे चारित्र्य आहे, असा हल्ला Sanjay Raut यांनी चढवला.

शरद पवार, उद्धव ठाकरेंसारखे नेते आहेत तोपर्यंत महाराष्ट्र दिल्लीपुढे कधी झुकणार नाही; संजय राऊत यांनी ठणकावलं

‘निवडणुकीत वातारण निर्मितीसाठी राष्ट्रपती अयोध्या दौऱ्यावर’

निवडणूक सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना अयोध्येला पाठवण्यात येत आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली गेली, त्यावेळी राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यावेळी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आलं. त्यावेळी त्यांचा सन्मान करण्याची आवश्यकता होती. पण आता निवडणूक आहे. आणि निवडणुकीत वातावरण निर्मिती करण्यासाठी राष्ट्रपतींना भाजपतर्फे तिथे पाठवण्यात आले आहे. ही काही मोठी गोष्ट नाही. निवडणूक संपत नाही तोपर्यंत अशा घटना देशात होत राहणार. राष्ट्रपतींना कधी या मंदिरात तर कधी त्या मंदिरात पाठवलं जाईल. पंतप्रधानही जात राहतील. भस्म, चंदन लावतील. त्याचे फोटोही येतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला.

प्राण गेला तरी बेहत्तर, महाराष्ट्र हुकूमशहाच्या हाती जाऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांची सिंहगर्जना