
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने वनतारा (स्टार ऑफ द फॉरेस्ट) कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. वनतारा कार्यक्रमांतर्गत देशातील आणि विदेशातील जखमी अवस्थेत सापडलेल्या प्राण्यांना वाचवणे, त्यांची देखभाल करणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्यावर अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षित डॉक्टरांकडून उपचार करणे हे या वनतारा कार्यक्रमातून केले जाणार आहे. यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे संचालक अनंत अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे.





























































