दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याप्रकरणी आणखी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्यावरून दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एका संशयिताला काश्मिरमधून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मेहबूब युसूफ असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे एटीएसने दापोडीतून लष्कर ए तय्यबा संघटनेच्या संपर्कात असल्यावरून मोहम्मद जुनैद मोहम्मद याला अटक केली होती. त्याच्याकडे तपासातून अफताबला अटक करण्यात आली. त्यानंतर नुकतीच इनामुल हक याला अटक केली आहे. तिघांना अटक केल्यानंतर आता एटीएसने चौथा संशयित याला अटक केली आहे. मोहम्मद युसूफ याला काश्मिरमधून अटक करण्यात आली. जुनेद सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अफताब व इमानुल यांच्याकडे चौकशी सुरू असताना युसूफची माहिती मिळाली होती. त्यानंतर एटीएसने त्याला अटक केली आहे.