मुंबईच्या ओव्हल मैदानात आज रंगणार आंतर मुंबई दिव्यांग क्रिकेट स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर दि डिसेबल्ड या संस्थेच्या वतीने उद्या, मंगळवारी 31 मे 2022  रोजी आंतर मुंबई दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये मुंबईतील 6 नामवंत दिव्यांग क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.

आंतर मुंबई दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत बोरिवली इलेवन, स्वामी विवेकानंद, पालघर इलेवन, कल्याण इलेवन, जय अंबे आणि कुलाबा इलेवन हे दिव्यांग क्रिकेटपटूंचे नामवंत संघ सहभागी होत आहेत. ही स्पर्धा ओव्हल मैदान, हुतात्मा चौक, मुंबई विद्यापीठासमोर संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पांडुरंग सकपाळ (विभागप्रमुख, दक्षिण मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 9 वाजता होणार आहे. तरी मुंबईतील दिव्यांग खेळाडूंनी स्पर्धा पाहण्यास यावे, असे आवाहन मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर दि डिसेबल्ड संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे व सचिव विलास मोरे यांनी केले आहे.