
ऍपलचे देशातील पहिले स्टोअर मंगळवारपासून मुंबईत सुरू झाले. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी याचे उद्घाटन केले. वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये 22 हजार चौरस फूट जागेत हे स्टोअर आहे. लोकांमध्ये ऍपल उत्पादनांची इतकी क्रेझ आहे की स्टोअर उघडण्यापूर्वी सकाळी 11 वाजल्यापासून स्टोअरबाहेर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या स्टोअरमध्ये नवीन आयफोन्स आणि कंपनीची अन्य उत्पादने मिळणार आहे. या स्टोअरमध्ये 100 सदस्यांची टीम ग्राहकांसाठी कार्यरत असून 20 भाषांमध्ये ग्राहक सेवा उपलब्ध असणार आहे.



























































