
>> शिरीष कणेकर
आज सुरू होणाऱया इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आपल्या संघात एक-दोन बदल तरी होतील का? काहीही बदल होणार नाहीत असे कर्णधार विराट कोहली ठामपणे म्हणतो. किमान जडेजा व इशांत शर्मा वगळले जातील असे आपण म्हणतो. पंतचे फलंदाजीतील सातत्यपूर्ण अपयश पाहता यष्टिरक्षण के. एल. राहुलकडे सुपूर्द करून संघात एक फलंदाज-बहुधा मयंक आगरवाल- खेळवला जाईल असे सीमारेषेपलीकडून खेळ पाहणाऱया माझ्यासारख्या स्वनियुक्त तज्ञांची अपेक्षा आहे. कोहलीच्या मते संघात सहा फलंदाज पुरेसे आहेत. त्यांची संख्या वाढवून काही होणार नाही. आहेत त्या फलंदाजांनी आपली जबाबदारी ओळखून चांगली कामगिरी करायला हवी. मान्य आहे, पण तशी कामगिरी त्यांच्याकडून होत नसेल तर त्यांना बसवून इतरांना संधी द्यायला नको का? ते संघात केवळ राखीव खेळाडू म्हणून खुर्च्या उबवण्यासाठी निवडलेत का?
सूर्यपुमार यादवला सहाव्या क्रमांकावर खेळवावं याबाबत माजी यष्टिरक्षक-फलंदाज फरुख इंजिनीअर आग्रही आहे. दौऱयाच्या अनाकलनीय आखणीमुळे आपल्या संघाची गोची झाल्येय. कसोटीपूर्वी दोन-तीन परगाण्यांविरुद्ध खेळण्याचा सराव त्यांना मिळायला हवा होता. आपलं तंत्र तपासून घेण्याची, त्यात सुधारणा करण्याची, विकेट व वातावरणाशी जुळवून घेण्याची एकही संधी त्यांना मिळालेली नव्हती. पृथ्वी शॉ, सूर्यपुमार यादव व हनुमा विहारी यांना एकदम थेट अँडरसन आणि अन्य लांडग्यांसमोर टाकणे कितपत योग्य आहे? अन् दुसरा पर्याय तरी काय आहे? सूर्यपुमारच्या दर्जाविषयी शंका नाही, पण वेगळय़ा वातावरणात, वेगळय़ा विकेटवर, वेगळय़ा माऱयावर तो अपयशी ठरला तर या गुणी फलंदाजाची कारकीर्दच धोक्यात येऊ शकते. पृथ्वी शॉचं काय झालं? ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन अपयशांनंतर तो कसोटी क्रिकेटच्या रिंगणातून जो बाहेर फेकला गेला तो अजून बाहेरच आहे. सूर्यपुमारची मोलाची वर्षे आधीच वाया गेलीत, आता ‘पनवती’ नको.
अगदी स्पष्ट बोलायचं तर अजिंक्य रहाणेनं निराशा केल्येय. एका 61 धावांच्या खेळीला लटपून तो संघात राहू शकत नाही. (उपकर्णधाराला संघातून डच्चू दिल्याचा पायंडा कोणी पाडलाय का?) तो फारशा धावा करीत नाही यापेक्षा तो ज्या पद्धतीने खेळीमागून खेळी विकेट गमावतोय त्यांनी अस्वस्थ व्हायला होतंय. बघताना असं वाटत राहतं की, याला पुन्हा खेळायला दिलं तर हा पुन्हा लगेच असाच स्लिपमध्ये झेल देऊन बाद होईल. पुजारा प्रदीर्घ काळानंतर मोठी खेळी खेळला, पण पुजारा व रहाणे दोघांच्याही संघातील जागा दोलायमान आहेत व दुसऱया दोन फलंदाजांनी या जागा घेण्याची तयारी ठेवावी.
चार वेगवान गोलंदाज खेळवून आपण ‘लॉर्डस्’वर देदीप्यमान विजय मिळवल्यानं कोहलीचा या माऱयावर दृढविश्वास बसलाय. ‘लीडस्’वरील अपयशानंतरही कोहलीचा हा विश्वास डळमळीत व्हायला तयार नाही. जगातील सर्वोत्पृष्ट ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन याला संघात स्थानच का मिळू शकत नाही, हे समजण्यापलीकडचे आहे. डावखुऱया फलंदाजां विरुद्ध अधिक मारक म्हणून ओळखला जाणारा अश्विन, इंग्लंडमध्ये बर्न्स, मलान, मोईन अली व सॅम करन असे चार-चार डावरे फलंदाज असताना संघात येऊ शकत नाही? अश्विनमुळे माऱयात वैविध्य येत नाही का? चारातला एक वेगवान गोलंदाज (पक्षी ः इशांत शर्मा) कमी करण्यात व त्याच्या जागी अश्विनला खेळवण्यात अडचण काय आहे? इशांत शर्माला दुखापत झाली असावी व त्यामुळे तो अडथळत धावत होता, असं कोणी सांगितल्यावर कोहली निर्विकारपणे म्हणाला, ‘मी स्लिपमध्ये होतो, मला दिसलं नाही.’ (जिथून सगळं नीट दिसेल त्या टी.व्ही.समोर कोहली का बसत नाही?)
‘व्रँबल्ड सीम’ हा नवीन प्रकार पाश्चात्य वेगवान गोलंदाजांनी शोधून काढलाय. शिवणीपाशी उभा चेंडू धरून दोन्ही स्विंग करण्याऐवजी तीच चेंडूवरील शिवण वेडीवाकडी धरण्याकडे या गोलंदाजांचा कल दिसून येतो. इथेही जेम्स अँडरसन (त्याची सुरत रहाणेपेक्षाही रडकी आहे.) आघाडीवर आहे. अलीकडेच एका मुलाखतीत अँडरसन म्हणाला, ‘चेंडू कसा स्विंग होईल हे मलाही कळत नाही.’
खुद्द गोलंदाजालाच कळत नसेल तर त्याला तोंड देणाऱया फलंदाजांची किती त्रेधा उडत असेल कल्पना करा. यावर मात करण्याचा बऱयापैकी प्रयत्न आपल्या के. एल. राहुलनं केलाय. (तरी ‘लीडस्’वर तो अनुक्रमे शून्य व आठ धावांवर आटोपला.) तो पुढे खेळताना बॅट पिंचित पॅडच्या मागे ठेवतो. थोडा बाहेर वाटणारा चेंडू सोडून देतो व तो आत येतोय असं वाटल्यास ऐन वेळेला बॅट मध्ये घालतो. वाटतं तेवढं सोपं नाही. राहुललाही प्रत्येक वेळेला कुठं जमतंय? जडेजाची फलंदाजी (व अर्थातच क्षेत्ररक्षण) एवढी महत्त्वाची वाटत असेल तर त्याच्या जागी अश्विनला खेळवण्याची चूक करू नका. त्याला एका वेगवान गोलंदाजाच्या जागीच खेळवा. मागल्या दौऱयात एका कसोटीत अश्विन दोन्ही डावांत आपला ‘टॉप स्कोअरर’ होता हेही विसरू नये.
कोहली वगळता आपल्या सर्व फलंदाजांचा भर बचावावर बघायला मिळतो. या बचावामुळे संघाची स्थिती भक्कम होत नाहीच, उलट गोलंदाज जोरात येतात. मार पडत नसल्यानं ते गोलंदाजीत विविध प्रयोग करू शकतात व फलंदाज सापळय़ात सापडतात. स्विंगचा अंदाज न आल्यानं ते पायचीत होतात.
हिंदुस्थानी फलंदाजीत सहाव्या फलंदाजाची भर घालावी हे मत कोहलीनं धुडकावून लावलंय. तो म्हणतो, ‘जे काय करायचंय ते आहेत त्या पाच फलंदाजांनीच करायचंय. प्रत्येक वेळेला तळाचे फलंदाज मदतीला धावून येतील ही अपेक्षा चुकीची आहे.’ मान्य. त्यामागची जिगरही मान्य, पण आहेत ते फलंदाज खेळत नसतील किंवा पुरेशा धावा करीत नसतील तर काय करायचं? पुढल्या मालिकेत संघात बदल करून या मालिकेत उर्वरित दोन सामन्यांत त्यांचा काय उपयोग? कोहलीनं काय फलंदाजांना अभय दिलं असेल तर त्याच्या हाताला हात लावून मम म्हणणं जिवावर येतंय. त्यांच्यावर हवा तेवढा विश्वास नाही व नवीन लोकांना खेळवणं धाडसाचं वाटतं अशी काही तरी विचित्र काsंडी निर्माण झाल्येय.
आज ‘ओव्हल’वर सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. निदान नवीन प्रश्न निर्माण होणार नाहीत असं म्हणूया. समस्त इंग्लिश फलंदाजांनी – विशेषतः ज्यो रूटनं – अॅँडरसनसारखी फलंदाजी करावी (म्हणजे भोपळा फोड ला तरी पुष्कळ झालं) असंच आपलं अव्यक्त स्वप्न असणार. चला तर मग, दुपारची झोप टाळून टी.व्ही.समोर बसूया.




























































