
निळकंठ कुलकर्णी << [email protected] >>
एक जाज्वल्य दत्तवतार म्हणजे सन 1854 ते 1915 ह्या काळात होऊन गेलेले परमहंस परिव्राजका चार्य श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज होय . श्री क्षेत्र माणगांव येथे श्री हरिभट टेंबे या दत्तोपासकाचे वास्तव्य होते. त्यांचे थोरले चिरंजीव श्री. गणेशपंत टेंबे हे मुळचेच विरक्त होते. वडिलांच्या दत्तभक्तीचा वारसा श्री. गणेशपंतांनी उचलला होता. ते दररोज श्री दत्तपादुकांची पूजा व श्रीगुरुचरित्राचे वाचन करीत असत. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या आशिर्वादाने श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीदत्तरूपाने श्री गणेशपंत टेंब्याच्या घरी अवतार घेतला. नवजात बालाचं नाव ‘वासुदेव’ ठेवण्यात आलं.
बालपणापासूनच प्रगल्भ बुद्धीमत्ता आणि तेजस्वी वाणी असणाऱ्या वासुदेवाची छाप कोणावरही चटकन पडत असे. लहानपणीच वेद मुखोद्गत करून सर्व शास्त्रचं अध्ययन त्याने केलं होतं वयाच्या बाराव्या वर्षी दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ते प्रसिध्द झाले. श्रीवासुदेवशास्त्रीबुवांचा विवाह त्यांच्या वयाच्या 21 व्या वर्षी श्रीबाबाजीपंत गोडे यांची कन्या अन्नपूर्णा बाईशी झाला व तद्नंतर त्यांनी ‘ स्मार्तागी ‘ उपासना सुरू केली. त्या सोबत श्रीगायत्री पुरश्वरण आणि ज्योतिषाचा अभ्यास चालू होताच. वडीलोपार्जित दत्तभक्तीचा वारसा श्रीवासुदेवशास्त्रीबुवांकडे आला होताच. अखंड वेदाध्ययन, वैयक्तिक साधना आणि त्यासोबत पीडितांना मार्गदर्शन त्यांची त्याला मिळालेली जोड, यामुळे ते लहान वयातच उच्च आध्यात्मिक अनुभवाचे अधिकारी बनले. परिणामस्वरूप त्यांना स्वप्नंदृष्टतासह श्रीदेवांची (भगवान श्रीदत्तात्रेय) वाणी ऐकू येत असे. संत नामदेवांबरोबर ज्याप्रमाणे श्रीविठ्ठल बोलत असे, त्याप्रमाणे भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्याशी संवाद साधत असत. त्याचं संपूर्ण जीवन त्या पथप्रदर्शक श्रीदेववाणीच्या प्रकाशात व्यतीत झालं, एवढंच नव्हे तर त्यांच्या संपर्कात जे जे आले, त्या त्या सर्वांचे जीवन त्यांनी त्या वाणीसामर्थ्याद्वारे उजळून टाकलं.
कोकणातील माणगाव येथील ही घटना आहे. एका गृहस्थाला कुणी तरी गावातील श्री गणेशभट टेंबे यांच्या मुलाचे नाव सुचविले. त्याचे नाव वासुदेव वासुदेवला ( श्रीमदपरमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे ) स्वामी महाराज ) मंत्राची माहिती होती. गाय दूध देईनाशी झाली होती. तीच्यावर मंत्राप्रयोग करण्यासाठी टेंब्याच्या वासुदेवला आमंत्रण देण्यात आले. वासुदेव त्या गृहस्थाच्या घरी उपस्थित झाला आणि त्याने त्या धिंगाणा घालणाऱ्या गायीवर मंत्रप्रयोग केला. अगदी शांत झाली होती; मग ती दूध काढू घ्यायला तयार झाली वासुदेव हा एकपाठी होता एकदा वाचलेली गोष्ट त्यांची तोंडपाठ होत असे वयाच्या बाराव्या वार्षिच त्याने ऋग्वेद संहिता, पदे , घन इत्यादींचा अभ्यास केला होता याच वेळी तो दशग्रंथी ह्या नावाने प्रसिध्यी पावला गुरुचारित्राचा पाठ तो प्रतिदिनी वाचत असे वयाच्या पंधराव्या वर्षांपासून लोक टेंब्याच्या वासुदेवाला शास्त्रीबुवा म्हणून संबोधू लागले. त्यावेळी उज्जैनीला जाण्यासाठी म्हणून शास्त्रीबुवा नर्मदा तीरावरच्या मंडलेश्वर ह्या गावी आलेले होते. तेथे कैवल्याश्रम नावाचे थोर सत्पुरुष वास्तव्य करीत होते शास्त्रीबुवांनी स्वामींची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी स्वामींनी मी तुम्हला दंड देतो, असे सांगितले त्यामुळे शास्त्रीबुवा उज्जैनीला न जाता मंडलेश्वरलाच राहिले त्याच रात्री श्रीदत्त भगवान हे शास्त्रीबुवांच्या स्वप्नांत गेले व त्यांना विचारू लागले की तुम्ही माझी आज्ञा उल्लघन करणार की काय? दुसऱ्या दिवशी कैवल्याश्रमस्वामींच्या कानावर घातली हे ऐकल्यावर स्वामींनी शास्त्रीबुवांना दंड दिला नाही.
नंतर शास्त्रीबुवा तेथून निघून उज्जैनीला येऊन पोचले तिथल्या दत्त मंदिरात जाऊन शास्त्रीबुवांनी नारायणस्वामींची भेट घेतली हकीकत निवेदन केली. त्यावर नारायणस्वामी त्यांना म्हणाले त्यांनी जर का आज्ञा केली, तर मला तुम्हला दंड देता येईल एरवी दंड डरता येणार नाही. आदरपूर्वक नमस्कार करून आपली सारी हकिकत त्यांच्या कानावर घातली तेव्हा ते म्हणाले फार उत्तम नंतर स्वामींनी नारायणस्वामींना बोलावून घेतले आणि शास्त्रीबुवाना दंड देण्याविषयी आज्ञा केली. जेष्ठ वद्य द्वितीयेच्या दिवशी शास्त्रीबुवाना दंड देण्याचा विधी झाला आणि त्यांचे नाव वासुदेवानंदसरस्वती असे ठेवण्यात आले. त्या दिवसापासून सारे लोक शास्त्रीबुवांना वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज म्हणू लागले. त्या दिवशी वासुदेवानंदानी नारायणस्वामींबरोबर भिक्षा केली श्री दत्तमहाराजांना ही गोष्ट पसंत पडली नाही वासुदेवानंदांना ओकाऱ्या सुरू झाल्या कितीही उपाय केले तरी त्या थांबत नव्हत्या. नारायणस्वामी घाबरून गेले. श्री दत्तमहाराजांची आज्ञा उल्लघन केल्यामुळे हा सारा प्रकार झाला असे कळताच नारायणस्वामींनी श्री दत्तमहाराजांना वंदन करून त्यांची प्रार्थना केली दत्तमहाराज! हा आपला शिष्य आहे व मीही आपलाच शिष्य आहे माझ्या अपराधाबदल मला क्षमा करा आणि ह्या शिष्याला आपण बरं करा ह्या पुढे आपल्या आज्ञेविरुद्ध कोणतेही कार्य यांना कधी सांगणार नाही, व त्या नंतर वासुदेवानंदाच्या ओकाऱ्या थांबल्या.
नरसोबाच्या वाडीला श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचे स्मृतीमंदिर आहे नरसोबा वाडीचे दत्तस्थान हेच श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचे प्रेरणास्थान होय. श्री क्षेत्र माणगाव येथे श्रीवासुदेवशास्त्रीबुवांनी स्थापन केलेलं श्रीदत्तमंदिर हा त्या श्रीदेववाणीचाच आज्ञारूप आविष्कार आहे. यापुढील सात वर्षे आपण माणगावमध्ये राहणार आहोत ह्या शब्दामध्ये श्रीदत्तात्रेयांनी आपल्या परमभक्ताला आश्वासित केलं आणि माणगावात श्रीदत्तमंदिराची स्थापना करवली ते वर्षं होत सन 1883 भगवान श्रीदत्तात्रेय आणि श्रीवासुदेवशास्त्रीबुवा ह्या देव-भक्ताच्या आल्हाददायक लिलांना साक्षी होण्याचे भाग्य माणगांवकराना लाभले.
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।



























































